कोण आहेत आर्यनची केस लढविणारे वकील सतीश मानशिंदे

मुंबई गोवा क्रुझवर सुरु असलेल्या रेव पार्टीत ड्रग्ससह पकडला गेलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यनची केस लढविण्यासाठी शाहरुखने वकील सतीश मानशिंदे यांची नियुक्ती केली आहे. सतीश मानशिंदे यांची ओळख बॉलीवूड मध्ये प्रभावी वकील अशी असून बॉलीवूड मधील अनेक कलाकारांच्या केस त्यांनी न्यायालयात लढविल्या आहेत.

५६ वर्षीय सतीश मानशिंदे हाय प्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या संजय दत्तला त्यांनीच जामीन मिळवून दिला होता. २००२ मध्ये दारू पिऊन कार चालवून काही लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या सलमान खानला त्यांनीच जमीन मिळवून दिला होता आणि नंतर सलमानची या केस मधून निर्दोष मुक्तता झाली होती.

सुशांतसिंग राजपूत केस मध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याना जामीन मिळवून देण्याचे काम सतीश मानशिंदे यांनीच केले आहे शिवाय पालघर साधू हत्या प्रकरणात विशेष लोक अभियोजक म्हणून त्यांनी काम केले आहे. सतीश यांनी १९८३ मध्ये प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या हाताखाली उमेदवारी सुरु करून त्यांच्या सोबत १० वर्षे काम केले आहे. या काळात अनके राजकीय नेते, अभिनेते यांच्या केसेस त्यांनी लढविल्या आहेत. बॉलीवूड लाईफ रिपोर्ट नुसार सतीश मानशिंदे यांची फी भरभक्कम आहे. एका दिवसासाठी त्यांची फी १० लाख रुपये आहे असे समजते.