‘युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल जगतोय शाही आयुष्य

वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल याची शानोशौकत आणि चैनी आयुष्य जगण्याची लाईफस्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. क्रिसने त्याच्या अलिशान घराचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. टी २० मुळे क्रीसचे करियर आणि त्याची भरभराट जणू आसमानाला पोहोचली आहे.

जमैका मधील सुंदर पहाडावर क्रिसचा तीन मजली अलिशान बंगला आहे. त्यात हाउस पार्टी साठी खास सोय, पूल पार्टी साठी स्वीमिंग पूल, खास डान्स फ्लोर, क्लब अश्या अनेक अलिशान सुविधा आहेत. पोलीस अधिकारी वडील आणि स्नॅक्स विकणारी आई यांच्या पोटी जन्माला आलेल्या क्रिसने स्वकर्तृत्वावर हे वैभव मिळविले आहे. त्याला अलिशान कार्सचा शौक असून त्याच्या संग्रही मर्सिडीस, लोम्बर्गिनी पासून लँड क्रुझर, हर्ले डेविडसनची बॅड बॉय पर्यंत अनेक कार्स आणि बाईक्स आहेत. त्याच्या पत्नीचे नाव नताशा आणि मुलीचे नाव ब्लश आहे.

गेलने १० देशांच्या १४ फ्रँचायजी मध्ये टी २० स्पर्धा खेळली आहे. आयपीएल शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, जमैका, इंग्लंड, बांग्लादेश, द. आफ्रिका साठी टी २० लीग स्पर्धेत तो खेळला आहे.