जिओच्या ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार २०% कॅशबॅकसह मोफत कॉलिंग


आपल्या ग्राहकांना रिलायन्स रिटेल जिओच्या तीन प्रीपेड प्लॅनवर २० टक्के कॅशबॅक देत येत आहे. तीन रिचार्ज प्लॅनवर कंपनीने कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. यामध्ये २४९, ५५५ आणि ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला कॅशबॅक मिळू शकेल. पण हा कॅशबॅक तेव्हाच उपलब्ध होईल, जेव्हा तुम्ही MyJio अॅप किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज कराल. वापरकर्त्यांच्या जिओ खात्यात टेलिकॉम ऑपरेटर कॅशबॅक जमा करेल, जे भविष्यातील रिचार्जसाठी वापरले जाऊ शकतात.

फक्त तीन प्लॅनवर जिओची ही कॅशबॅकची ऑफर लागू होईल, ज्याची किंमत २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे आणि या प्लॅनमध्ये दररोज २ जिबी (2GB) हाय स्पीड डेटा देण्यात आला आहे.

रिलायन्स जिओकडून २४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्ही रीचार्ज केल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर बद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला दररोज २ जिबी (2GB) डेटासह २८ दिवसांची वैधता आहे. तुम्ही यात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा आणि दररोज १०० एसएमएस पाठवू शकतात.

जिओच्या ५५५ रुपयांच्या या प्लानमध्ये वापरकर्त्यांना २०% कॅशबॅक देखील दिले जात आहे. तुम्हाला या प्लानमध्ये दररोज १.५ जिबी डेटा देण्यात आला आहे. ज्याची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज एसएमएस करू शकतात.

२० टक्के कॅशबॅक ५९९ रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये देण्यात आला आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये देखील दररोज २ जिबी (2GB) डेटासह ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यानुसार या प्लॅनमध्ये दररोज १६८ जिबी डेटा आणि १०० एसएमएस तुम्ही करू शकतात. वर नमूद केलेल्या सर्व जिओ रिचार्ज प्लॅनसह, JioCinema, JioTV, Jio Security, Jio News आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्समध्ये एक्सेस मोफत देण्यात आला आहे.