ऑक्टोबर महिन्यात दहा दिवस बंद रहणार बँका


नवी दिल्ली – पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बँकशी संबंधित तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण महाराष्ट्रात १० दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये, म्हणून आपल्या माहितीसाठी आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत.

आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकतीच बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. प्रत्येक राज्यात संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेले आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. विविध बँकांची कामे सध्या कोरोना काळात ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील काही आवश्यक कामासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता असेल, तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

२ ऑक्टोबर रोजी सर्व राज्यात महात्मा गांधी जयंती निमित्त बँका बंद असणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी असेल. ९ ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार आणि १० ऑक्टोबर रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. १५ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा/ दसरा/ विजयादशमी असल्यामुळे इंफाळ आणि शिमला वगळता देशभरातील सर्व ठिकाणच्या बँका बंद असतील. पुन्हा १७ ऑक्टोबर रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. १९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी / मिलाद-ए-शरीफ / बारावाफतसाठी अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका बंद असतील. तर २३ ऑक्टोबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असेल म्हणून बँका बंद असतील आणि २४ ऑक्टोबर रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. शेवटच्या आठवड्यात ३१ ऑक्टोबर रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.