थियेटर्स उघडणार, चित्रपटांच्या रिलीज डेटचा वर्षाव
महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृहे खुली केली जात असल्याची घोषणा होताच बॉलीवूड चित्रपटाच्या रिलीज डेटचा जणू वर्षाव झाला असून एकच दिवशी १८ चित्रपटांच्या रिलीज डेट जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
करोनामुळे गेले काही महिने चित्रपट आणि नाटक गृहे बंद आहेत. आता करोना आटोक्यात आल्याचे आणि परिस्थिती सामान्य बनत चालल्याचे लक्षात घेऊन जनजीवन पूर्ववत होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच निर्मात्यांनी दोन दिवसात १८ चित्रपट रिलीज तारखा जाहीर केल्या आहेत. हे चित्रपट २०२१ आणि २०२२ सालात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
ऐन दिवाळीत सूर्यवंशी प्रदर्शित होत आहे. बंटी अँड बबली १९ नोव्हेंबर, सत्यमेव जयते पार्ट २- २६ नोव्हेंबर, जर्सी १ डिसेंबर, तडप ३ डिसेंबर, चंदिगड करे आशिकी १० डिसेंबर, ८३- २४ डिसेंबर हे चित्रपट याच वर्षात येत आहेत तर पृथ्वी २१ जानेवारी २०२२, लालसिंग चढ्ढा १४ फेब्रुवारी, जयेशभाई जोरदार २५ फेब्रुवारी, बच्चन पांडे ४ मार्च, शमशेरा १८ मार्च, भूलभूलय्या दोन २५ मार्च, केजीएफ दोन १४ एप्रिल, मे डे २९ एप्रिल, हिरोपंती ६ मे, रक्षाबंधन ११ ऑगस्ट आणि अक्षयकुमारचा रामसेतू दिवाळी २०२२ अशा या तारखा आहेत.