आता पीएफ खात्याशी निगडित सुविधा मिळणार UMANG आणि DigiLocker वर


मुंबई : सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, DigiLocker वर देखील आता तुमच्या पीएफ खात्याशी निगडित असलेल्या अनेक सुविधा तुम्हाला मिळतील. डिजीलॉकर हे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे, ज्याठिकाणी कागदपत्रे सुरक्षितपणे साठवली जातात. पडताळणीसाठी DigiLockerमधील दस्तऐवज वापरले जाऊ शकतात आणि सरकारी संस्था ते स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. DigiLockerची लोकप्रियता पाहता सरकारने या मोबाईल अ‍ॅपवर ईपीएफओ सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या ज्यांचे पीएफ खाते आहे, ते आता DigiLockerवरून त्यांचे UAN कार्ड वापरू शकतात. ईपीएफओनुसार, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN सरकारी ई-लॉकर मोबाईल अ‍ॅप Digilocker वर मिळवता येतो.

डिजीलॉकरद्वारे पीएफ खातेधारक UAN आणि PPO डाउनलोड करू शकतात. तुम्ही जर पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर तुम्ही ईपीएफओशी संबंधित अनेक कागदपत्रे डाऊनलोड करू शकाल आणि पीएफशी संबंधित सुविधा मिळवू शकाल

DigiLocker कडून UAN आणि PPO क्रमांक कसे मिळवायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला http://digilocker.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तिथे तुम्हाला साइन इन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करा.
  • त्याठिकाणी आधार आणि यूजरनेम प्रविष्ट करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल, तो त्या फॉर्ममध्ये भरुन सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर 6 आकडी सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • तुम्हाला जारी केलेले दस्तऐवज दाखवले जातील, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर त्याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. तुम्हाला येथे Get more issued documents वर क्लिक करावे लागेल.
  • Central Government या टॅबमध्ये जा आणि तेथे लिहिलेल्या Employees Provident Fund Organization वर क्लिक करावे.
  • तुम्हाला आता स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. येथे UAN वर क्लिक करा आणि UAN क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Get Document वर क्लिक करा.
  • हे सर्व केल्यानंतर तुम्हाला UAN कार्ड पीडीएप स्वरूपात दिसेल जे तुम्हाला सहज डाऊनलोड करता येईल.