अजित पवार मोठा नेता नाही, मोठा नेता मानण्याचे कारण देखील नाही ; निलेश राणे


मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच टोले लगावले होते. किरीट सोमय्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील या वादात उडी घेत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.


यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, चंद्रकांत पाटील अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाहीत, त्यांना मोठा नेता मानण्याचे कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही.