
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला 19 जुलैला रात्री उशीरा अटक करण्यात आली होती.
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर
राज कुंद्रासह त्याचा साथीदार रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी रायनला रायगडमधून अटक केली गेली होती. रायन हा राज कुंद्राच्या आयटी कंपनीचा हेड होता. रायन हा शिल्पा शेट्टीच्या मर्जीतला समजला जातो.
अश्लील व्हिडिओ प्रकरणी आयपीसीच्या विविध कलमांनुसार आणि आयटी एक्टनुसार राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. 19 जुलैला अटक त्यानंतर आज 20 सप्टेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली म्हणजेच 2 महिन्यांनी राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. या प्रकरणी राज कुंद्राने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
