सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेटने रद्द केला पाकिस्तानचा दौरा


लाहोर – आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होणार होता. पण न्यूझीलंड क्रिकेटने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड संघ 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात न्यूझीलंड तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार होती.

आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार होती. पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणामुळे संपूर्ण पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी -20 मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की ही मालिका नंतर खेळवली जाईल आणि ती तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

पाकिस्तानचा सध्याचा दौरा न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण देत रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट म्हणाले की, त्यांना मिळालेला सल्ला पाहता दौरा सुरू ठेवणे शक्य नाही. ते म्हणाले, मला माहित आहे यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल. पण खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा एकमेव जबाबदार पर्याय आहे.

आपल्या अधिकृत निवेदनात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी लाहोरला जाण्यापूर्वी आजपासून आम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची होती. पण, न्यूझीलंड सरकारकडून आम्हाला पाकिस्तानमधील धोक्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, सुरक्षा सल्लागारांशी सल्ला मसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे की न्यूझीलंड संघ हा दौरा चालू ठेवणार नाही. आता संघाच्या वापसीची व्यवस्था केली जात आहे.