विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी


पुणे – आता पुण्यात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (DPCA पुणे) सेवा निवृत्त पोलीस अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

https://punepolice.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश पात्र उमेदवारांना देण्यात आले आहेत. एकूण ०३ रिक्त पदांची घोषणा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (डीपीसीए पुणे) भर्ती मंडळ, पुणे यांनी सप्टेंबर २०२१ च्या जाहिरातीत केली आहे. १ ऑक्टोबर २०२१ रोजी थेट बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखत द्यायला जावे लागणार आहे.

एकूण ०३ रिक्त पदांची घोषणा
गुन्हे अन्वेषण, लाचलुचपत विभाग, अतिदक्षता विभाग, गुप्त वार्ता दक्षता विभाग आणि राज्य मानवी हक्क आयोगाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी या पदांसाठी आवश्यक आहेत.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर उपस्थित रहावे.

मुलाखती विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे या पत्त्यावर सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होतील. मुलाखतीची तारीख १ ऑक्टोबर २०२१ आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • कोणतेही एक ओळखपत्र
  • सेवानिवृत्त असल्याचा दाखला
  • PPO ची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.punepolice.gov.in या वेबसाईटवर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन वाचा.