पुण्यातील गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीबाबत घेतला ‘हा’ निर्णय


पुणे – यंदाही कोरोनाच्या परिस्थितीत पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक होणार नाही. समाजहितासाठी मानाच्या गणपती मंडळांनी यंदाही उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतर ४५ मिनिटांच्या क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.

श्री कसबा गणपती ११ वाजता, तांबडी जोगेश्वरी ११.४५ वाजता, गुरुजी तालीम १२.३०, श्री तुळशीबाग १.१५ मिनिटांनी, केसरी वाडा २ वाजता, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती २.४५ मिनिटांनी विसर्जित होईल. दरम्यान श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या शुभहस्ते उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे कळवले आहे.