मुंबई महानगरपालिका सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी नोकरभरती


कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिका सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजर, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी भरती होत आहे. याचे नोटिफिकेशन महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.Municipalbankmumbai.com वर आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • उप. महाव्यवस्थापक
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – १ पद
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – १ पद
  • सहाय्यक महाव्यवस्थापक – १ पद
  • वरिष्ठ व्यवस्थापक – १ पद
  • सहाय्यक व्यवस्थापक – १ पद

बँकेच्या www.Municipalbankmumbai.com या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवाराने ऑनलाइन तपशील भरून अर्ज करावा आणि नॉन रिफंडेबल शुल्कासोबत “द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई” च्या बाजूने डिमांड ड्राफ्टसह डाउनलोड केलेले योग्यरित्या स्वाक्षरी केलेले पीडीएफ अर्ज सबमिट करावे. सर्व संबंधित स्व -प्रमाणित कागदपत्रे जोडा जसे की जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, नवीनतम वेतन स्लिप इत्यादी पोस्ट बॉक्स क्रमांक १०२७, जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई – ४००००१ वर ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी पोहचवावा. अर्ज करण्यासाठी फी रु. ५००/- आहे.