गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार


अहमदाबाद – आपल्या पदाचा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला असून शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. ५ वर्षांसाठी मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.

अवघ्या एका वर्षाचा कालावधी राज्यातील विधानसभा निवडणुकीला उरलेला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे. पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.