टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा घटस्फोट?


टीम इंडियाचा गब्बर अर्थात धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनच्या काडीमोडाची बातमी समोर येत आहे. सोशल शिखरची पत्नी आयेशा मुखर्जीची पोस्ट सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नऊ वर्षापूर्वी 2012 साली शिखर धवन आणि आयशा मुखर्जी विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर आहे. शिखरपेक्षा दहा वर्षाने आयशा मोठी आहे. शिखर धवनशी आयशाचा हा दुसरा विवाह होता.

पहिल्या पतीपासून आयशाला दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 साली आयशाने झोरावरला जन्म दिला. शिखर आणि आयशाच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या 2020 साली समोर आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. दरम्यान आपल्या इन्स्टाग्राम अकाउऊंटवरून शिखरचे सगळे फोटो आयशाने डिलीट केले आहेत. पण शिखरने अद्यापही आयशाचे फोटो डिलीट केलेले नाही.