100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत मुकेश अंबानी


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी या वाढीमुळे 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आले आहेत. 3.7 अब्ज डॉलर्सनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढली आहे. कारण सोमवारी रिलायन्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी 2479.85 रुपयांवर पोहोचले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 92.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 64 वर्षीय अंबानी जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. अंबानींनी या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांच्या संपत्तीत 15.9 अब्ज डॉलरहून अधिक वाढ केली आहे. मंगळवारी आरआयएलचा शेअर 0.7% वाढून 2441.3 रुपयांवर बंद झाला.

15.5 लाख कोटी रुपयांच्या जवळ कंपनीचे मूल्य आल्यामुळे भारतातील सर्वात मौल्यवान आणि 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेली पहिली कंपनी बनली आहे. तज्ज्ञांच्या मते, आरआयएलच्या शेअरची किंमत अशीच वाढू शकते. कारण एक वर्षाच्या एकत्रीकरणानंतर लार्ज-कॅप स्टॉकने नवीन ब्रेकआउट दिला आहे आणि पुढील 9-12 महिन्यांत 3,000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

सध्या मुकेश अंबानींच्या यांच्या पुढे 11 अब्जाधीश आहेत.

  1. अॅमेझॉनचे जेफ बेझोस ($ 201 अब्ज)
  2. टेस्लाचे एलोन मस्क ($ 199 अब्ज)
  3. एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट ($ 164 अब्ज)
  4. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ($ 154 अब्ज)
  5. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग. ($ 140 अब्ज)
  6. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज ($ 128 अब्ज)
  7. सेर्गेई ब्रिन ($ 124 अब्ज)
  8. मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर ($ 108 अब्ज)
  9. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन ($ 104 अब्ज)
  10. बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफे ($ 103 अब्ज)
  11. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स, लॉरियल संस्थापकाची नात ($ 92.9 अब्ज)