गांधी कुटुंबियांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल


पुणे – अभिनेत्री पायल रोहतगी हिने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी दिली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल रोहतगी हिने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्या माध्यमांतून हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार संगीता तिवारी यांनी दिली होती. त्या आधारे पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.