जाणून घ्या वाढदिवशी मेणबत्ती विझवल्याने होणारे दुष्परिणाम


वॉशिंग्टन – जन्मदिनी मेणबत्तीला फुंकर घालून विझवण्याची आपली परंपरा नाही. या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला त्याच दिव्याने ओवाळले जाते. पण मेणबत्तीला फुंकर घालून विझवण्यामुळे होणा-या दुष्परिणामाचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या मेणबत्ती विझवण्याच्या या कृतीमुळे १४०० टक्क्यांनी वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे. याबाबतचे संशोधन अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केले असून संशोधन केल्यानंतर या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाढदिवसाच्या दिवशी केक सजवून ठेवलेला असतो व मेणबत्ती लावलेली असते व ती फुंकर मारून विझवली जाते. पण त्यामुळे केकवरील जंतू वाढून आरोग्याला धोका निर्माण होतो.

हे संशोधन जर्नल ऑफ फूड रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून मेणबत्ती पेटवून बरोबर केक आणण्याची पद्धत प्राचीन ग्रीसमध्ये शिकारीची देवता असलेल्या आर्टेमिसच्या मंदिरात होती. इतर संस्कृतीतील आख्यायिकेप्रमाणे मेणबत्तीचा धूर हा सदिच्छा व प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो. ही परंपरा अनेक देशात सुरु आहे, पण जेव्हा आपण मेणबत्तीवर फुंकर मारतो तेव्हा मानवी श्वासातील बायोएरोसोलमधील जिवाणू केकच्या पृष्ठभागावर बसतात. एरोसोल केकवर गेल्याने हा धोका निर्माण होतो. संशोधकांनी मेणबत्तीवर फुंकर मारल्यानंतरचे केकचे नमुने घेऊन तपासणी केली असता त्यात जिवाणू मोठय़ा प्रमाणावर आढळून आले. त्यामुळे जिवाणूंचे प्रमाण १४०० टक्के वाढते असे दिसून आले.

Leave a Comment