या मॉडेलच्या कमनीय बांध्यावर लाखो फिदा


सोशल मीडिया एक असे माध्यम आहे ज्यामुळे लोकांना लोकप्रिय होण्यासाठी वेळ लागत नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून लोक लोकप्रिय होत आहेत. त्याचबरोबर काही लोकांना या माध्यमामुळे मॉडेलिंग आणि चित्रपट क्षेत्रातून ऑफर देखील मिळत आहेत. अमेरिकेच्या एरिजोनामध्ये राहणारी जॅलिनी ऑजेडा ऑचोआ (Jailyne Ojeda Ochoa) सोशल साईड्सवर अशीच लोकप्रिय झालेली एक तरुणी आहे. लाखो लोकांनी या तरुणीला फॉलो केले आहे.

लाखो लोक जॅलिनीच्या कमनीय बांध्यावर फिदा झाले आहेत. ती दिसायला खूपच स्लिम असून परंतु अमेरिकेच्या मॉडेल किम कार्दशियनसारखे तिचे बट आहेत. तब्बल ५० लाखांहून अधिक फॉलोअर या तरुणीचे इंस्टाग्रामवर आहेत. तर तिच्या फेसबुक पेजला ८ लाख लोकांनी लाइक केले. काही कंपन्यांकडून जॅलिनीला मॉडेलिंगसाठी बऱ्याच ऑफर आल्या आहेत. तिचे म्हणणे आहे, की तिला अभिनयामध्ये करिअर करायचे आहे, एवढचं नव्हे तर ती दररोज एक्सरसाईज आणि डेली रुटीनमधले फोटो फॉलोवर्ससाठी उपलोड करत असते.

Leave a Comment