भारतीय हवाई दलात 10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी


नवी दिल्ली – कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांकरिता भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचा भाग होण्याची संधी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना उपलब्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार त्यांच्या पसंतीच्या हवाई दल स्टेशनवर ऑफलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात. २१ ते २७ ऑगस्ट २०२१ रोजी एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या तारखेपासून उमेदवार ३० दिवसांच्या आत २१ सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यातून अर्ज सादर करू शकतात.

दरम्यान जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त पात्रतेसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ १२ वी उत्तीर्ण/ मॅट्रिक्युलेशनसह विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ साठी https://indianairforce.nic.in/ या लिंक द्वारे अर्ज करू शकतात. तसेच https://indianairforce.nic.in या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आणखीन माहिती जाणून घेऊ शकतात. नागरी श्रेणी अधीक्षक, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, कुक, पेंटर आणि इतर पदांसाठी एकूण २८२ पदांची भरती करण्यात येत आहे. दरम्यान पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशीलांची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • हेड क्वार्टर मेंटेनन्स कमांडची १५३ पदे
  • मुख्यालय मेंटेनन्स कमांडची ३२ पदे
  • हेड क्वार्टर वेस्टर्न एअर कमांडची ११ पदे
  • स्वतंत्र युनिट्सची १ पदे
  • कुकसाठी ५ पदे (सामान्य श्रेणी)
  • मेस स्टाफची ९ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफची १८ पदे
  • हाऊस कीपिंग स्टाफची १५ पदे
  • हिंदी टाइपिस्टकरिता ३ पदे
  • लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी १० पदे
  • स्टोअर कीपरची ३ पदे
  • सुतार कामाकरिता ३ पदे
  • पेंटरसाठी १ पोस्ट
  • अधीक्षक (स्टोअर) करिता ५ पदे
  • सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ३ पदे

कोणत्या पदासाठी किती शिक्षण आवश्यक?

  • अधीक्षक या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • LDC या पदाकरिता तुम्हाला मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे महत्त्वाच आहे.
  • स्टोअर कीपर या पदासाठी तुम्ही बारावी किंवा समकक्ष पास असणे आवश्यक आहे.
  • कुक या पदाकरिता तुम्ही मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून १० वी पास बरोबर तुम्हाला कॅटरिंग किंवा या क्षेत्रात डिप्लोमा केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • पेंटर, सुतार, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, एसी मेक, फिटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, ट्रेड्समन या सर्व पदांकरिता तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी पास असणे आवश्यक आहे.
  • हिंदी टायपिंग करिता तुम्ही १२ वी पास असणे आवश्यक आहे.
  • आयएएफ ग्रुप सी भर्ती २०२१ यात विविध पदांसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.