इंटरनेटवर गाजतेय हार्दिक पांड्याचे घड्याळ

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे घड्याळ इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आले असून स्वतः हार्दिकनेच त्याचा या घड्याळासह फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिकने क्रिकेट मध्ये कमी वेळात करियर बनविण्यात यश मिळविले आहे आणि त्याच्या लग्झरी लाईफच्या चर्चा नेहमीच होत असतात. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले हार्दिक आणि कुणाल हे बंधू महागडी घड्याळे, महागड्या कार या शौकांबद्दल नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी मुंबईच्या महागड्या वस्तीत अलिशान घर घेतल्याची चर्चा होत होती.

वर्ल्ड क्रिकेटमध्ये हार्दिकने प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळविली आहे. आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी हार्दिक दुबईत दाखल झाला असून त्याने लगेचच त्याच्या नव्या घड्याळाचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या घड्याळाची किंमत ५ कोटींपेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे. Patek Phillippe Nautilus Platinum 5711 ब्रांडचे हे घड्याळ आहे.

सोशल मीडियावर हार्दिक आणि कुणाल दोघेही नेहमीच सक्रीय असतात.