व्हॉटस अपवर बुक करता येणार करोना लस स्लॉट

केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी करोना लसीकरण प्रमाणपत्र सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून डाऊन लोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेच पण लस घेऊ इच्छिणाऱ्यांना आता व्हॉटस अप वरून लस घेण्यासाठीचा स्लॉट बुक करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. स्लॉट बुक करताना जवळचे लसीकरण केंद्र कुठले याची माहिती सुद्धा मिळू शकणार आहे.

व्हॉटस अपचे नवीन फिचर, MyGov Corona helpdesh बरोबर काम करणार आहे. लसीकरणासाठी स्लॉट बुक करताना हेल्प डेस्क चॅट बॉट नंबर =९१-९०१३१५१५१५ सेव्ह करायचा आहे. नंतर व्हॉटस अप ओपन करून हेल्पलाईन कॉन्टॅक्ट ओपन करून ‘बुक स्लॉट’ टाईप करून पाठवायचा आहे. त्यानंतर मोबाईल वर सहा आकडी ओटीपी येईल. तुम्हाला लोकेशन, तारीख व कुठली लस हवी त्याची निवड करण्याचा पर्याय मिळेल आणि पिन कोडच्या हिशोबाने जवळचे सेंटर व स्लॉट बुकिंग समजणार आहे.

अर्थात कोवीन पोर्टलवरून सुद्धा लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे, व्हॉटस अप चॅट बॉटचा वापर सरकार गेल्या वर्षीपासून करोना अपडेट देण्यासाठी आणि करोना संबंधित लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी करत आहे.