अॅमेझॉन देत आहे अमिताभ बच्चन यांच्याशी बोलण्याची सुवर्णसंधी!


हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे, पण ती कधी पूर्ण होईल याचा भरवसा नाही. पण आपली तिच इच्छा अॅमेझॉन पूर्ण करणार आहे. कारण आपल्या अलेक्सावर अॅमेझॉनने अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे. गुगल असिस्टंट आणि सिरीकडे वळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनने ही अनोखी शक्कल लढवली असून ही सेवा 19 ऑगस्टपासून लॉन्च करण्यात आली आहे.

अॅमेझॉनने आपल्या बहुचर्चित सेवा Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे. जर हा आवाज वापरकर्त्यांना सुरु करायचा असेल, तर त्यांना 149 रुपये इन्ट्रोडक्टकरी म्हणून मोजावे लागतील. त्यानंतर वापरकर्त्यांना ही सुविधा एक वर्षापर्यंत अनुभवता येईल.

अमिताभ बच्चन यांचा आवाज Alexa वर आपल्याला सुरु करायचा असेल तर आपल्या आवाजात Alexa, introduce me to Amitabh Bachchan, असे म्हणावे लागेल. या व्यतिरिक्त आपल्याला ही सुविधा थेट अॅमेझॉनच्या साईटवरुनही खरेदी करता येईल. पैसे भरल्यानंतर Alexa वरुन अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळेल.

आपल्याला ही सुविधा सुरु करताना Amit ji हा वेकअप की वर्ड वापरावा लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या आवाजात Alexa, enable Amit ji wake word, असे म्हणावे लागेल. त्यानंतर Alexa बाय डिफॉल्ट काम करेल. Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज आणणार असल्याची घोषणा गेल्या वर्षी अॅमेझॉनने केली होती. त्याचा उद्देश अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना तसेच बॉलिवूडच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा होता.