पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय सुडबुद्धीने राणेंवर कारवाई – दरेकर


रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रत्नागिरी पोलिसांनी केली आहे. यावर प्रकरणावर बोलतांना, आमची नेते मंडळी कायदेशीर प्रक्रिया करणार आणि न्यायालयाकडून सकारात्मक निकालाची अपेक्षा, असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर म्हणाले, राणे यांना पोलिसांनी कोणत्या कारणावरुन अटक केली. तसेच जामीन अर्ज कोणत्या ग्राऊंडवर फेटाळण्यात आला हे तपासण्यात येईल. जो कायदेशीर लढा उभारायचा आहे, त्या संदर्भात निश्चितपणे भूमिका घेण्यात येईल. कायदेशीर अटकेची बाजू समजून घेण्यात येईल. त्यानंतर या विरोधात आम्ही अपील करु.

नाशिक पोलीस आयुक्तांनी ज्याप्रकारे आदेश काढला आणि राणेंना अटक होते. कायदा व बघता ही अटक झाल्याचे दरेकर म्हणाले. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे देखील दरेकर म्हणाले.