सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करु; आशिष शेलारांचा शिवसेनेला गर्भीत इशारा


रत्नागिरी – रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असून मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य केले आहे. हे सरकार ज्या प्रकारे वागत आहे अफगाणिस्तानमधील तालिबानीसुद्धा यांच्यासमोर शरमेने आत्महत्या करतील, एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीमधील लोक करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. आम्ही या अटकेचा निषेध आणि धिक्कार करतो. राज्यसरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो, सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करु. राज्यसरकार या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे वागत आहे अफगाणिस्तानमधील तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीमधील लोक करत आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजपच्या कार्यालयाजवळ हे तमाशे चालू झाले, तर महाराष्ट्रभर भाजप तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

ज्याप्रमाणे ही कारवाई झाली आणि मंत्री अनिल परब यांची एक क्लिप बाहेर आल्यामुळे आता तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोक आता जमलेले दिसत आहेत. नारायण राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होणार असतील, तर आता तुम्ही क्लिप दाखवता आहे, तर आमच्याकडे सीडी आहे हे लक्षात ठेवा, असे आशिष शेलार म्हणाले.