गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवले क्रिप्टोकरंसी संदर्भातील आठ अॅप्स


मुंबई – क्रिप्टोकरंसी संदर्भातील आठ अॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन डिलिट केले आहेत. या अॅपबद्दल असा दावा केला जात आहे की, हॅकर्स या अॅप्सच्या मदतीने युझरच्या अकाऊंटची डिटेल्स लीक करत होते. गुगलने ही धोकादायक अॅप्स आता डिलीट केली आहेत. BitFunds, Bitcoin अशा अॅप्सचा यात समावेश आहे. तुमच्याही मोबाईलमध्ये जर अशी अॅप्स असतील तर तात्काळ ही अॅप्स डिलीट करा. या अॅप्सच्या मदतीने यूझर्सच्या अकाऊंटची माहिती लीक झाल्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो.

क्रिप्टोकरंसीसाठी हे अॅप्स इंस्टॉल केल्यानंतर हॅकर्स अॅडच्या माध्यमातून एक व्हायरस पाठवायचे. ज्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती सहज लीक व्हायची. यामुळे आता गुगलने असे अॅप्स डिलिट केले आहेत. सिक्युरिटी फर्म Trend Micro च्या माहितीनुसार या आठ अॅप्सच्या माध्यमातून युझर्सना जाहिराती पाहाव्याच लागायच्या. या अॅप्स यूझर्सकडून महिन्यापोटी 1,115 रुपयांचे सब्सक्रिप्शन देखील घेतले जायचे. सोबतच अकाऊंटची महत्वाची माहिती हॅकर्सकडे आपोआप जायची.

गुगल प्ले स्टोअरवरुन डिलीट करण्यात आलेली अॅप्स

  1. BitFunds – Crypto Cloud Mining
  2. Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
  3. Bitcoin 2021
  4. MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
  5. Ethereum (ETH) – Pool Mining Cloud
  6. Bitcoin Miner – Cloud Mining
  7. Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
  8. Crypto Holic – Bitcoin Cloud Mining