व्हॉट्सअॅपचे नवे फीचर; जाणून घ्या काय मिळणार नव्या अपडेटमध्ये


नवी दिल्ली : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने डिसअपियरिंग मेसेज हे नवे फीचर लाँच केले होते. मेसेज रीड झाल्यानंतर सात दिवसांच्या आत या फीचरमध्ये आपोआप डिलीट होतो. पण आता या फीचरमध्ये काही अपडेट येणार आहेत. आता कंपनी युजर्सला आपले मेसेज अधिक दिवसांपर्यंत ठेवण्यासाठीचा एक पर्याय देणार असल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट ट्रॅकर WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरमध्ये कंपनी मेसेज 90 दिवसांपर्यंत ठेवण्याचा पर्याय टेस्ट करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा वर्जन 2.21.17.16 मध्ये 90 दिवसांपर्यंत मेसेज ठेवण्याचा पर्याय देऊ शकतं. WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

या रिपोर्टमध्ये 7 दिवसांसह 90 दिवसांचाही पर्याय दिसत असल्याचे म्हटलं आहे. त्याशिवाय 24 तासांसाठीचा पर्यायही असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या नव्या फीचरसाठी कंपनी अनेक दिवसांपासून टेस्ट करत आहे. हे फीचर सध्या अंडर डेव्हलपमेंट असून बीटा टेस्टर्ससाठीही उपलब्ध नाही.


दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप RAM कमी असणाऱ्या फोनमध्ये वापरताना स्टोरेज फुल होण्याची समस्या येते. त्यामुळे फोन हँग होतो. परंतु या फीचरच्या मदतीने फोनच व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज आपोआप डिलीट करले. त्यामुळे फोन हँग होण्याची समस्याही कमी होईल.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने iPhone मधून अँड्रॉईड आणि अँड्रॉईडमधून iPhone मध्ये चॅट ट्रान्सफर करण्याचे फीचर दिलं आहे. ज्यात चॅटशिवाय व्हॉईस नोट, इमेज एका क्लिकवर ट्रान्सफर करता येतील. व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी पहिल्यांदाच असे फीचर दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या अँड्रॉईड फोनमध्ये चॅट बॅकअपसाठी गुगल ड्राईव्हचा वापर करते. तर iPhone मध्ये चॅट बॅकअपसाठी व्हॉट्सअ‍ॅप iCloud चा वापर करते.