एका महिन्यानंतर ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोमध्ये परतली शिल्पा शेट्टी


पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक केली. शिल्पाला या अटकेचा मोठा फटका बसला होता. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या ही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. त्याचबरोबर ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील हजर नव्हती. तसेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये पण ती दिसली नाही. पण आता या शोचे शिल्पाने पुन्हा चित्रीकरण सुरु केले आहे. अशात आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने तिला सपोर्ट करत तिच्या इन्स्टाग्रामवर एका स्टोरी शेअर केली होती.

आपल्या इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीच्या परत येण्याच्या निर्णयाचे हिना खानने कौतुक करत एक स्टोरी पोस्ट केली होती. यात तिने शिल्पाला शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले आहे. तिने यो गो गर्ल, हग्स, असे त्या स्टोरीमध्ये लिहिले होते. तसेच एक हार्ट ईमोजी शेअर केला आहे. शिल्पा शेट्टीला १८ ऑगस्ट रोजी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या सेटवर पाहिले होते. त्यावेळेस तिने लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

२०१६ पासून शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’या शोची परीक्षक असल्यामुळे या शोचे निर्माते शिल्पाच्या परतीची वाट बघत होते. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा शोमध्ये परत येण्याचा निर्णय खूप धाडसाचा आहे. निर्माते खुश आहेत की शिल्पाने शूट सुरू केले आहे आणि पुन्हा त्यांना तिची रिप्लेसमेंट शोधावी लागणार नाही. शिल्पाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिच्या खासगी आयुष्याची चर्चा करू नका, अशी विनंतीच लोकांना केली होती.