महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 149 जागांसाठी नोकर भरती


मुंबई : कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत असून त्याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

पहिली पोस्ट – इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

एकूण जागा – 94

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

दुसरी पोस्ट – वायरमन (तारतंत्री)

एकूण जागा – 55

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयाची अट: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट