पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आज मिळणार नववा हप्ता


नवी दिल्ली : आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी जारी करणार आहेत. आज दुपारी एका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील 9.75 कोटी शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर 19,500 कोटी रुपये वर्ग करणार आहेत.

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत नाव पाहण्यासाठी

  • पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला https://pmkisan.gov.in भेट द्या.
  • त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा पर्याय येईल.
  • Farmers Corner मध्ये Beneficiaries List या पर्यायावर जा.
  • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
  • त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.