16 ऑगस्टपासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी सीईटी परीक्षेपूर्वी भरु शकणार प्रवेश अर्जाचा भाग एक


मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक ,अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वांसाठी सदर प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 16 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठीची सुविधा सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांना सरावासाठी 13 ऑगस्टपासून संकेतस्थळावर मोफत रजिस्ट्रेशन म्हणजे तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुढील प्रमाणे असेल अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित नियोजन वेळापत्रक

16 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे लॉग इन आयडी पासवर्ड तयार करावा लागेल. मिळालेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग एक भरणे सोबतच शुल्क आणि फॉर्म लॉक करावा लागेल.

अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा मार्गदर्शक केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे.

17 ऑगस्टला विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाईन तपासून व्हेरिफाईड करतील

21 ऑगस्ट राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रोजी होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग-1 भरता येईल. सीईटी परीक्षा झाल्यानंतर मिळालेले गुण पसंती क्रमांक या गोष्टींसाठी अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरण्यासाठी सुधारित वेळापत्रक सीईटी परीक्षा झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.