भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक


नवी दिल्ली – टीम इंडियाने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ४ ऑगस्टपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

पावसाचे लहरी वातावरण इंग्लंडमध्ये असल्यामुळे सामन्यात अनेकदा खंड पडतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचे सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे इंग्लंडमध्ये पावसाचे गणित रोज बदलत असल्यामुळे कदाचित पाऊस पडणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

इंग्लंड आणि भारत या संघात आतापर्यंत एकूण १२६ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी २९ सामन्यात भारताने, तर ४८ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर ४९ सामने अनिर्णित ठरले आहेत. या सामन्यांपैकी ६२ सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत. त्यात ३४ सामन्यात इंग्लंडने, तर ७ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २१ सामने अनिर्णित ठरले आहेत.

भारतीय संघ- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, सूर्यकुमार यादव (अजून सामील होणे बाकी आहे), पृथ्वी शॉ (अजून सामील होणे बाकी आहे)

राखीव खेळाडू- प्रसिध कृष्णा, अरझन नागवासवाला

इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, मार्क वुड, सॅम कुरन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, क्रेग ओव्हरटन

भारत- इंग्लंड कसोटी सामन्याचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट ( ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम)
  • दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट ( लॉर्ड मैदान, लंडन)
  • तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (लीड्स)
  • चौथा कसोटी सामना २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर (ओव्हल मैदान, लंडन)
  • पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅचेस्टर)