कार्तिक आर्यनच्या ‘कॅप्टन इंडिया’चे पहिले पोस्टर रिलीज


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी कार्तिक आर्यन हा एक आहे. सोशल मीडियावर कार्तिक सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आर्यन चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आर्यनने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आर्यनने ही पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट कार्तिकने शेअर केली आहे. कार्तितने या पोस्टद्वारे ‘कॅप्टन इंडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. कार्तिक या पोस्टरमध्ये कॅप्टनच्या युनिफॉममध्ये दिसत आहे. तर पोस्टरमध्ये कार्तिकचा चेहरा दिसत नसून समोर एक विमान आणि काही घरे दिसत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत कार्तिकने त्याला जेव्हा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एक पुरुष जातो, मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत ‘कॅप्टन इंडिया’, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. कार्तिकने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख किंवा हा चित्रपट कुठे पाहता येणार याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

हंसल मेहता ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजने सगळ्याची मने जिंकली. त्याचबरोबर कार्तिक लवकरच ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर कार्तिकला ‘शेहजादा’ या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाच्या चर्चेसाठी कार्तिक रोहित धवनच्या ऑफिसमध्ये गेल्याचे म्हटले जाते.