या अॅपच्या मदतीने जाणून घ्या कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे सिम कार्ड


सिम कार्ड घेण्यासाठी सध्या खोट्या ओळखपत्राचे प्रमाण खूप वाढले आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस माहित नसते की, जे सिम कार्ड आपण वापरत आहोत, ते कोणाच्या नावावर आहे. त्यामुळे आपल्यासाठी या ट्रिक फायदेशीर ठरू शकतात. एअरटेल अॅपच्या मदतीने आपण माहित करून घेऊ शकता की, कोणाच्या नावावर आपल्या सिम कार्डची नोंदणी आहे. यासाठी आपल्याकडे असलेल्या टेलीकॉम कंपनीचे अॅप डाउनलोड करावे लागेल. सर्व कंपन्यांची प्रक्रिया सारखीच असते.

सर्वात आधी प्ले स्टोरवर जाऊन एअरटेल अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही परवानगी मागितली जाईल. त्याला Allow करा. आपला मोबाइल क्रमांक आता येथे दिलेल्या एका कॉलममध्ये टाका. त्यानंतर याच क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी अॅपमध्ये टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

लगेच, तुमचे अकाउंट ओपन होईल. त्यानंतर आपल्या अॅपवर सर्वात वरच्या बाजूला सिम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याचे नाव दिसेल. जर ते नाव तूमचे असेल तर ठिक नाहीतर समजून जा की, आपले सिम दुसऱ्याच्या नावावर आहे. आपल्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर असेल तर सर्वात आधी आपल्या सिमकार्ड कंपनीशी संपर्क करा. त्यांनी सांगितलेल्या आदेशांचे पालन करा आणि आपला मोबाइल क्रमांक आधारसोबत नोंदणी करा.

Leave a Comment