हा सील मासा माणसांप्रमाणे गाऊ शकतो ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’


धूसर रंगाच्या सील माश्याचा स्कॉटलँडच्या संशोधकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. हा मासा मनुष्याचा आवाज आणि ‘ट्विंकल, ट्विंकल लिटिल स्टार’ यांसारख्या ध्वनींची नक्कल करू शकतो, असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. तीन प्रशिक्षित माशांना लोकप्रिय संगीताची नक्कल करताना यूनिव्हर्सिटी ऑफ सेंट एंड्रूयजच्या संशोधकांनी दाखवले आहे.

गुरुवारी संशोधकांच्या टीमने शोधलेली सत्य माहिती प्रकाशित झाली. संशोधनकर्त्यांना या अभ्यासाने व्होकल लर्निंग आणि मानवी भाषेला अधिक उत्तमपणे समजून घेण्याची संधी दिली. हा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे की, बोलण्यात येणाऱ्या समस्यांच्या अभ्यासामध्ये हा सील मासा खूप महत्वपूर्ण ठरू शकतो. कारण हादेखील त्याचप्रकारे स्पीच ट्यूबचा वापर करतो जसा मनुष्य करतात.

Leave a Comment