भंगारात जाण्याच्या प्रतिक्षेत साडेचार हजार विमाने


नवी दिल्ली : विमानाकडे आपण नेहमीच जगातील सर्वात अलिशान प्रवासाचे साधन म्हणून पाहतो. पण प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित असतो आणि तो निसर्गाचा नियमच आहे. त्यातच आता आम्ही तुम्हाला विचारतो विमान जुने झाल्यावर त्याची कुठे विल्हेवाट लावली किंवा त्याचे काय केले जाते ? नाही ना माहित तर चला मग आम्ही सांगतो तुम्हाल की काय होते या जुन्या विमानांचे…अमेरिकेतील अॅरीझॉना प्रांतातील हे विमानतळ विमानांची दफनभूमी म्हणून ओळखली जाते. तसेच येथे तब्बल साडेचार हजार विमाने भंगारात जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

अमेरिकेतील अॅरिझोना प्रांतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ आहे. तब्बल 4 हजार 400 विमाने बोनयार्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या विमानतळावर नांगर टाकून आहेत. यातील बहुतेक विमान कधीच उड्डाण घेणार नाहीत. अॅरीझॉना येथे ही विमानांची दफनभूमी आहे. बोनयार्डमध्ये विमानांची दुरुस्ती आणि देखभाल होते. पण यातील अनेक विमाने कायमची भंगारात काढली जातात. येथे नाक काढलेली, पंख काढलेली विमाने पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर विमानांचे अवाढव्य सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. भंगारात काढल्या जाणाऱ्या विमानाचे पुनर्वापरायोग्य भाग काढून दुसऱ्या विमानाला बसवले जातात. येथे ज्या विमानांची दुरूस्ती होते ती आकाशात झेपावतात.

अॅरीझॉनातील वाळवंटातील बोनयार्डमधील विमाने शिस्तबद्ध पद्धतीने उभी केली आहेत. आकाशातून पाहताना ही विमाने फारच सुंदर दिसतात. पण या सौंदर्याचा शेवट शोकांतिकेत आहे. यातील अनेक विमानांचे सुटे भाग करून तो भाग रिकामा केला जातो. एकेकाळी आकाश गाजवलेली ही विमाने जमिनीवर स्वतःच्या अस्तित्वाचा शेवट कधी होईल याची वाट पाहतात.

Leave a Comment