३४ कोटींच्या वाडग्याचा होत होता बॉल ठेवण्यासाठी वापर


लोखंडाला सोने बनवणारा परिस आपल्याकडे आहे आणि आपल्याला माहितच असे झाले तर… पण असेच काहीसे उदाहरण सध्या समोर आले आहे. स्वित्झ्रर्लॅंडमधील एका दाम्पत्य तब्बल ३४ कोटी रूपयांच्या एका वाडग्याचा उपयोग चक्क टेनिस बॉल ठेवण्यासाठी करत होते. विशेष म्हणजे या दाम्पत्याला त्या वाडग्याची किंमतच माहिती नव्हती. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, हा कटोरा त्यांनी चीन प्रवासादरम्यान खरेदी केला होता.

हे वाडगे ज्यांचे आहे ते म्हणाले की, हे वाडगे एवढा किंमती आणि दुर्मिळ आहे याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांना काही ऑक्शन एक्सपर्ट काही वस्तूंचा लिलाव करण्यासाठी आले तेव्हा याबाबत कळाले. त्यांनी हे वाडगे पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले.

वाडग्याच्या मालकांनुसार, हे वाडगे ठेवण्याचा प्रस्ताव बर्लिन म्युझिअमने सुद्धा दिला होता. पण म्युझिअममधील अधिकाऱ्यांनी आता याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी याचे फोटो लिलाव करणाऱ्या एका ब्रिटीश कंपनीला दाखवले. पण त्यांनीही याला लिलावाचा भाग करण्यास नकार दिला.


दाम्पत्याने हे वाडगे दोन्ही प्रस्ताव फेटाळले गेल्यावर सामान्य असल्याचे समजून घरात बॉल ठेवण्यासाठी याचा वापर सुरू केला. हे वाडगे घरात एक डिस्प्ले आयटमसारखा ठेवले होते. हे स्वित्झर्लॅंडच्या ऑक्शन एक्सपर्टनी जेव्हा लिलावात ठेवले तेव्हा याची बोली ३४ कोटी रूपयांवर येऊन थांबली. लिलाव करणारी कंपनी कोलरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा फोटो शेअर केला. हॉंगकॉंगमध्ये झालेल्या लिलावात या वाडग्याला सर्वाधिक ३४ कोटी रूपये किंमत मिळाली. ही बोली चीनमधील एका व्यक्तीने लावली. हे वाडगे पितळेचे असून याच्या दोन्ही टोकांवर फीनिक्सचे डोके कोरले आहे.

Leave a Comment