उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल


मुंबई : उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून राज्यातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल.

निकालाबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील
www.mahresult.nic.in
www.mahresult.nic.in