मुंबई : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, अंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री.ए.एम.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत करण्यात आली असून या पुनरिक्षण समितीमध्ये सनदी लेखापाल व सेवानिवृत्त शिक्षण संचालक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच पुनरिक्षण समितीचे गठण पूर्ण झाले असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांसाठी विभागीय शुल्क नियामक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केले आहे.
माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत पुनरिक्षण समिती गठित
गठीत करण्यात आलेल्या पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितींच्या अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुनरिक्षण समिती – राज्य स्तर, मुंबईसाठी जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम),मुंबई दूरध्वनी क्रमांक मुंबई- (०२२) २३६३००८१, ४००००४, २३६३००९०, २३६३००८६ ई-मेल: [email protected]
विभागीय शुल्क नियामक समिती
- मुंबईः जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम), मुंबई-४००००४ (०२२) २३६३००८, २३६३००८६ ई- मेल: [email protected]
- पुणेः १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-४११००१ (०२०) २६१२२२१७, २६१२५६९६, २३६३००९० ई-मेल: [email protected]
- नाशिकः विभागीय आयुक्त कार्यालय आवार, जेत रोड, नाशिक रोड, नाशिक- ४२२१०१ (०२५३)२४५४९१० ई-मेल: [email protected]
- नागपूरः बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली नागपूर- ४४००१२ (०७१२) २४२१३९८ ई-मेल:[email protected]
- औरंगाबादः मुलींचे आयआयटी जवळ, भडकल गेट मीपा परिसर, औरंगाबाद-४३१००१ (०२४०) २३३६३१८/ – २३३४३७९ ई-मेल: [email protected]