पुणे महापालिकेत इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी


पुणे : लवकरच चौथी पास असलेल्या उमेदवारांची भरती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून ही भरती सफाईसेवक या पदासाठी होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 25 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 असणार आहे.

सफाई सेवक (Sweeper) – एकूण जागा 25

शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत त्यानुसार पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

वेतन – 17,205/- रुपये प्रतिमहिना

या पत्त्यावर पाठवा अर्ज – कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे -05

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा.