१० वी पास उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी


नवी दिल्ली – भारतीय नौदलाने नाविक एमआर (Sailor MR) पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी नौदलाने नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाईन अर्ज १९ जुलैपासून करू शकतात. शेवटची तारीख २३ जुलै २०२१ ही आहे.

नौदलामध्ये या भरतीच्या माध्यमातून सेलर मॅट्रिक (१०वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड आणि हायजिनिस्टच्या पदांसाठी एकून ३५० जागा भरल्या जाणार आहेत. योग्य पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी इंडियन नेव्ही भरती 2021 नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक योग्यता : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाकडून इच्छुक उमेदवार दहावीची परीक्षा उत्तीर्ण हवा.

वयाची अट : 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 य़ा दोन तारखांमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यांना या काळात 14,600 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना लेव्हल तीन नुसार 21,700 रुपये – 69,100 रुपये या स्केलने पगार दिला जाणार आहे. याशिवाय त्यांना डीए (DA) व्यतिरिक्त 5200 रुपये दर महिना एमएसपी दिला जाणार आहे.

शारिरीक योग्यता –
उंची : 157 सेमी
रनिंग: 1.6 किमी 07 मिनिटे
उठाबशा: 20
छाती : कमीतकमी 5 सेमी फुलविल्यानंतर

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षेसाठी उमेदवार हे दहावीच्या मार्कवर निवडले जाणार आहेत. कट ऑफ एका राज्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकतात. एकूण 350 जागा आहेत, यासाठी 1750 उमेदवारांनाच परीक्षांना बोलावले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.