RBI कडून बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी मिळतील 10 सरप्राइज सुट्ट्या


मुंबई : बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने चांगली बातमी दिली आहे. यासंदर्भात पीटीआयने दिलल्या वृत्तानुसार, बँकांमध्ये संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या लोकांना प्रत्येकवर्षी कमीत कमी 10 दिवसांच्या सरप्राइज सुट्ट्या दिल्या जातील. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना या तारखांबाबत किंवा काळाबाबत माहिती नसणार आहे. बँकेतर्फे अचानक सुट्टीची ऑफर दिली जाईल.

हे नियम कमर्शिअल बँकांच्या शिवाय ग्रामीण विकास बँक आणि सहकारी बँकांमध्येही लागू केले जातील. या नियमानुसार प्रत्येक वर्षी कमीत कमी 10 वर्किंग डे कर्मचाऱ्याला अचानक सुटी दिली जाईल. बँकांना दिलेल्या आपल्या नोटीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने विवेकपूर्ण जोखिम प्रबंधन उपाय अंतर्गत धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुट्टीवर असणाऱ्या स्टाफला कॉर्पोरेट ईमेल सोडून फिजिकल किंवा व्हर्चुअल कोणत्याही प्रकारचे काम देण्याची परवानगी बँकांना नसेल. बँकांच्या संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरप्राइज सुटीबाबत धोरण तयार करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.

बँकांना त्यांच्या निर्देशक मंडळने धोरण तयार करून संवेदनशील पदांच्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना सहा महिन्याची वेळ दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या तणावातून दिलासा मिळणार आहे.