अनिल अंबानींच्या दिवाळखोर कंपनीचा परवाना नुतनीकरणास DoTचा नकार


मुंबई – कर्जबाजारी झालेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी दिवसेंदिवस आणखीच वाढत आहेत. थकीत अनिल अंबानी यांच्या रिलायंस कम्युनिकेशंस कंपनीने रक्कम भरली नसल्यामुळे डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्स (DoT) ने अंबानी यांच्या कंपनीचा परवाना नुतनीकरण करण्यास नकार दिला आहे. अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशंस कंपनीकडे डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्सची जवळपास 26,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे. DoT ने म्हटले आहे की, ही कंपनी जोपर्यंत आपली थकीत रक्कम भरत नाही. तोपर्यंत कंपनीचा परवाना नुतनीकरण केला जाणार नाही.

जर रियालन्स कम्युनिकेशन आपली थकीत रक्कम भरण्यास यशस्वी ठरली नाही तर कंपनीला स्पेक्ट्रम (Spectrum) सरेंडर करावे लागेल आणि इनसॉल्वेंसी प्रोसेसच्या माध्यमातून एसेट सेल (Asset Sale) बाबतची त्यांची योजना प्रलंबित पडू शकते. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरकॉमने म्हटले आहे की, जर त्यांच्या स्पेक्ट्रमशी संबंधित अगोदरची थकीत रक्कम भरली नाही तर त्यांचे टेलिकॉम लाइसेंस रिन्यू (Telecom Licence Renew) होणार नाही. या आधी रिल्यूशन प्रोफेशनल विभागाने म्हटले आहे की, आयबीसी कोड नुसार कंपनीची थकीत मोरेटोरियमच्या अंतर्गत येते आणि ते भरण्याची आवश्यकता नाही.

आरकॉम ने DoT ला म्हटले आहे की, त्यांचे टेलिकॉम लायन्सस आणखी 20 वर्षांसाठी रिन्यू केले जावे. कंपनीजवळ संपूर्ण देशाच्या टेलिकॉम लायसन्स आहे आणि देशातील 22 टेलिकॉम सर्कलपैकी 14 मध्ये 850 मेगाहर्ट्स बँड स्पेक्ट्रम आहे. कंपनीने परवाना जुलैमध्ये संपत आहे. या कंपनीचा मालकी हक्क अगोदर अनिल अंबानी यांच्याजवळ होता. परंतू त्यांची रिजॉल्यूशन प्रोफेशनल (RP) डेलॉयट (Deloitte) सुरु आहे.

टेलिकॉम इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, DoT च्या निर्णयाविरुद्ध आरपी टेलिकॉम डिस्प्यूट्स सेटलमेंट अँड अपीलेट ट्रिब्यूनल (TDSAT) मध्ये अपील करु शकता. आरकॉमने या बाबतीत इटीच्या इमेलचे उत्तर दिले नाही. Deloitte च्या प्रवक्त्यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही गोपनीयतेबद्दल कटीबद्द आहोत आणि ग्राहकांशी संबंधी प्रकरणांवर टिप्पणी करु शकत नाही.