स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6100 अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती


नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदांसाठी भरती काढली आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित करण्यात आली आहे. या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 जुलै 2021 पासून अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख 26 जुलै 2021 आहे. पद, पात्रता आणि वेतन आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता जाणून घ्या.

 • स्टेट बँक ऑफ इंडिया नोकर भरती

एकूण पदे- 6100

पदाचे नाव- अप्रेंटिस

स्टेट बँक ऑफ इंडिया नोकर भरती राज्यनिहाय पदसंख्या

 • उत्तर प्रदेश- 875
 • आंध्र प्रदेश- 100
 • कर्नाटक- 200
 • मध्यप्रदेश- 75
 • छत्तीसगढ- 75
 • पश्चिम बंगाल- 715
 • पंजाब- 365 पद
 • राजस्थान- 650
 • गुजरात-800
 • आसाम- 250
 • तेलंगना- 125
 • महाराष्ट्र- 375

 

 • स्टेट बँक ऑफ इंडिया नोकर भरतीसाठी उमेदवारांची पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्थेतून पदवी, पदविका आवश्यक

वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा अधिक असू नये

 • स्टेट बँक ऑफ इंडिया नोकर भरती वेतन/मानधन

वरील पदासांसाठी सेवेत समाविष्ठ होणाऱ्या निवड होणाऱ्या व्यक्तीस प्रतिमहिना 15000 रुपये स्टायफंड दिला जाईल.

 • स्टेट बँक ऑफ इंडिया नोकर भरती निवडप्रक्रिया

SBI Apprentice Recruitment 2021 च्या वरील पदासाठी उमेदवाराची निवड ऑनलाईन लिखित परीक्षेद्वारे होईल. स्थानिक भाषेच्या आधारावर निवड होईल.

 • अर्ज पाठविण्याची मुदत, पत्ता आणि इतर माहिती

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) भरती पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून 6 जुलै ते 26 जुलै 2021 पर्यंत अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांनी 300 रुपये अर्जशुल्क द्यावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. वरील वृत्ताशी संबंधित अधिक माहितीसाठी एसबीयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.