
रत्नागिरी : लवकरच रत्नागिरी जिल्हापरिषदेत पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणारे उमेदवार आणि इंजिनिअर अर्ज करू शकणार आहेत. या पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 असणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील इंजिनिअर पदासाठी होणार पदभरती
या पदासाठी भरती
अभियंता (Engineer) (Civil) – एकूण जागा 10
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी उमेदवार संबंधित फिल्डमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणारा किंवा इंजिनिअर पाहिजे आहे. तसंच उमेदवाराला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा येणं अनिवार्य आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
