सेटिंग्जमध्ये करा हे बदल; WhatsApp वरील मॅसेज वाचल्यानंतर होणार आपोआप डिलीट


आपल्या युजर्सचा अनुभव चांगला बनविण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp एक नवीन फीचर्स आणत आहे. आता वापरकर्त्यांसाठी आणखी एक उपयुक्त फिचर कंपनीने आणले आहे. व्ह्यू वन्स (View Once) हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपने लॉन्च केले आहे. या फिचरचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा मॅसेज वाचला किंवा कोणताही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मॅसेज आपोआप डिलीट होईल. म्हणजेच, आपण एखाद्यास मॅसेज पाठविल्यास मॅसेज प्राप्त करणारा केवळ एकदाच पाहू शकेल.

मीडिया रिपोर्टनुसार सध्या हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपने सादर केले आहे. एकदा View Once फिचरद्वारे आपण अदृश्य होणारा फोटो फोनच्या गॅलरीतून पाठवू शकाल. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, फोटो निवडल्यानंतर आपल्याला View चिन्हावर टॅप करावे लागेल. आता कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना तुम्हाला एकदा कॅप्शन बारजवळ View Once पर्याय दिसेल. हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.

आता एकदा पाहिल्यानंतर आपला कोणताही मॅसेज किंवा व्हिडीओ डिलीट होणार नाही. आपण या फिचरद्वारे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याला एकदा पाहण्याची संधी मिळेल. मॅसेज पाठवणाऱ्याला आपला मॅसेज पोहचला आहे की नाही, तसेच तो समोरच्याने वाचला की नाही हे समजणार आहे.

यात मॅसेज रिसिव्ह करणारा त्याला पाहिजे असल्यास त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. असे केल्याने मॅसेज पाठवणाऱ्याला देखील कळणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट्स ओळखण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही. आपल्याला हे नवीन फिचर आल्यानंतर आपले पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याची गरज भासणार नसल्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा चॅटबॉक्स भरणार नाही. तुम्हाला मॅसेजेस पुन्हा पुन्हा डिलिट करण्यापासूनही सुटका होईल.