मिलिंद सोमणचा पत्नीसोबत पोर्तुगाल ते स्पेन पायी प्रवास


आपला लूक, फिटनेस आणि लव्ह लाईफ बद्दल मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर हे नेहमी अॅक्टिव्ह असतात. प्रेमाचा एक आदर्श ग्लॅमरच्या दुनियेतील या जोडीने जगासमोर ठेवला आहे. हे दोघेही नेहमी आपल्या जुन्या आठवणी आणि एकमेकांसोबतचे बॉन्डिंग आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. असाच एक थ्रोबॅक फोटो अंकिता कोंवरने शेअर केला आहे आणि त्यासोबत स्पेन ते पोर्तुगाल पायी प्रवासाचा एक किस्साही सांगितला आहे.


अॅडव्हेन्चर मिलिंद आणि अंकिता या दोघांनाही पसंत आहे. हे दोघेही नेहमीच तशाच प्रकारच्या ट्रिप करतात. असाच एका ट्रिपचा फोटो अंकिताने शेअर केला आहे. या फोटोत अंकिता कॅज्युअल लूकमध्ये दिसून येत आहे तर बॅकग्राऊंडही खूप सुंदर दिसत आहे. अंकिताने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, एक मजेदार झलक पोर्तुगाल ते स्पेन प्रवासातील. 320 किलोमीटरचे मी आणि मिलिंदने हे अंतर पायी कापले. या दरम्यान आम्ही देशातील आणि जगतील अनेक रंगीबेरंगी लोकांना भेटलो. मी एका जुन्या बोगद्यासमोर उभी आहे, जे या प्रवासाच्या वाटेत आम्हाला भेटले. दरम्यान अंकिताच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळत असून त्याच्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे.