नंबर सेव्ह न करता अशा प्रकारे कुणालाही व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा मेसेज


मुंबई : आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून दिले जातात. याचा युजर्सना नक्कीच फयदा होतो. आजवर अनेक फीचर्स व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सन दिले आहेत, पण नंबर सेव्ह न करता त्या नंबरवर मेसेज करण्याची परवानगी नसते, तसे अपडेट अद्याप तरी आलेले नाही. एखाद्या व्यक्तीला आपल्याला व्हॉट्सअॅप मेसेज करायचा असल्यास आधी त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपण मेसेज करु शकतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही कोणाही व्यक्तीला मेसेज करु शकता.

  • यासाठी तुम्हाला प्रथम आपल्याला मोबाईल किंवा डेस्कटॉपवर एक वेब ब्राउझर ओपन करावं लागेल.
  • त्यानंतर https://api.whatsapp.com/send?phone=XXXXXXXXXXX ही लिंक ओपन करा. जिथे X लिहिलं असेल तिथे कंट्री कोडसोबत नंबर टाका.
  • म्हणजेच, जर तुम्हाला 5555555555 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. तर ब्राउजरमध्ये https://api.whatsapp.com/send?phone=555555555 असा युआरएल लिहावा लागणार. इथे फोन नंबरआधी भारतासाठी असलेला कंट्री कोड 91 लिहा.
  • हा नंबर त्या व्यक्तीचा असावा ज्याला तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा आहे मात्र सेव्ह करायचा नाही.
  • जेव्हा आपण नंबर एंटर कराल त्यावेळी आपल्याला खाली एक मेसेज लिहिलेला दिसेल. आता खाली Message +911234567890 on Whatsapp असं लिहिलेले असेल.
  • त्याखाली लिहिले असेल शेअर करण्यासाठी टॅप करा. त्यानंतर एक पॉप-अप दिसेल ज्यामध्ये आपल्याला Open Whatsapp Desktop वर टॅप करावे लागेल.
  • Looks like you don’t have WhatsApp installed! DOWNLOAD or use WhatsApp Web असा मेसेज देखील येऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप वेब अॅक्सेस करावे लागेल.
  • यानंतर आपण सेव्ह न करता एखाद्या नंबरवर मेसेज करु शकता.

आपण नंबर सेव्ह न करता एखाद्याला मेसेज करत असाल तरीही ही चॅट पूर्णपणे एंड टू एंड एन्क्रिप्टेड असेल. आपण ही ट्रिक वापरल्यास एकावेळी केवळ एका युजरला मेसेज पाठवू शकता.