Microsoft Windows 11 च्या नव्या अपडेटमध्ये हे आहेत नवीन फीचर्स


मायक्रोसॉफ्टने तब्बल सहा वर्षांनंतर आपल्या विंडोजमध्ये अपडेट्स करत Windows 11 च्या रुपात नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. अनेक नवीन सुविधा या विंडोजमध्ये देण्यात आल्या आहेत. Microsoft Windows 11 मध्ये फ्रेश लूक, नवीन थीम, वेगळं स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट सेंटर आणि बऱ्याच नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत.

मायक्रोसॉफ्टमध्ये या आधी डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता Windows 11 मध्ये मध्यभागी ठेवला आहे. या नव्या विंडोजमध्ये जोडण्यात आल्याने व्हिडीओ कॉल्स आणि मेसेज करणे अधिक सोपे होणार आहे. तसेच विंडोज अपडेटची साईजही कमी करण्यात आल्यामुळे डाऊनलोड करणे अधिक सुलभ होणार आहे.

आता मध्यभागी स्टार्ट मेन्यू आणल्यामुळे या विंडोजमधील अॅप्स किंवा इतर फाईल्स या वेगाने सर्च केल्या जाऊ शकतील. तसेच स्टार्ट मेन्यूमधील विजेट्स आता स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर देण्यात आले असून त्यावर अनेक अॅप्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे डाऊनलोड करताना सुरक्षितता वाढली आहे.

आता Microsoft Windows 11 मधील नवीन फिचर्समुळे एका पीसीला दुसऱ्या पीसीशी कनेक्ट करणे सोपे झाले आहे. डॉक आणि अनडॉक फीचर्समुळे प्रो यूजर्सला हाय क्वॉलिटी एक्सपिरियंन्स मिळणार आहे. नवीन Microsoft Windows 11 मध्ये प्रोसेसर हा 1 GHz चा वापरण्यात आल्यामुळे याच्या वेगात वाढ झाली आहे. तसेच यामध्ये 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वापरण्यात आले आहे. याचा डिस्प्ले हा 9 इंचाचा असून 720p HD Resolution चा वापर करण्यात आला आहे.