अशा प्रकारे चेक करा तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतले


मुंबई : एका आधार कार्डच्या मदतीने 18 सिम कार्ड घेता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला माहिती न होता त्याच्या आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जाण्याची शक्यता वाढते. जर आपल्याला अशा परिस्थितीत हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसऱ्या कोणी सिमकार्ड घेतले आहे का? तर तुम्ही ते सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते. पण आता 18 सिमकार्ड एका आधार कार्डवर खरेदी करता येतात. ज्या लोकांना बिजनेसमुळे अधिक सिमकार्डची गरज असते, त्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नऊऐवजी ही संख्या 18 सिमपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अशा प्रकारे शोधा आपल्या आधार क्रमांकावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत ?

  • आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
  • हे जाणून घेण्यासाठी, आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.
  • यानंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.
  • त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.
  • आता तिथे View More पर्यायावर क्लिक करा.
  • येथे Adhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
  • आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.
  • आता येथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.
  • आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.
  • आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.
  • असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.
  • येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.