चितळे बंधूंना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या शिक्षिकेसह पाच जणांना क्राइम ब्रांचने ठोकल्या बेड्या


पुणे – पुण्यातील प्रसिद्ध चितळू बंधूंना ब्लॅमकेल करत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी चितळेंकडे दुधात काळा रंग असल्याचा दावा करत खंडणी मागितली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शिक्षिकेचा समावेश आहे. ही कारवाई क्राइम ब्रांचने केली अटक करण्यात आलेल्यांची असून करण परदेशी, सुनील परदेशी, अक्षय कार्तिक, पूनम परदेशी अशी नावे आहेत. याशिवाय इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

एका प्रतिष्ठित शाळेत अटक करण्यात आलेल्या पूनम शिक्षिका असून त्यांनी चितळे बंधूंना ईमेल तसेच फोन करुन दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याची तक्रार करत पाच लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी बदनामी करण्याची तसेच पैसे दिले नाहीत तर दुकान बंद करायला लावू अशी धमकीही दिली होती. सुरुवातीला त्यांनी केलेली पाच लाखांची मागणी नंतर २० लाखांपर्यंत पोहोचली होती.

या प्रकरणी चितळेंनी तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आल्या आणि बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींना देण्यासाठी पोलिसांनी चितळेंना २ लाख दिले होते ज्यामध्ये चलनात नसलेल्या २ हजारांच्या रुपयांच्या नोटा होत्या. जेव्हा आरोपींनी पैसे घेतले, तेव्हा पोलीस लांब उभे राहून सर्व पाहत होते. यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

मुंबईतून आरोपींचा एक साथीदार कार्तिक याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील, करण आणि अक्षय यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांचा लाँड्रीचा व्यवसायदेखील आहे.